परभणीत रंगणार ‘जल्लोष लोककलेचा’
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील बालकांमध्ये मराठी संस्कृती, परंपरा आणि लोककलेची ओळख अधिक भक्कम करावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम यंदा परभणीत रंगणार आहे. दिनांक २२ नोव्हेंबर र
परभणीत रंगणार ‘जल्लोष लोककलेचा’


परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील बालकांमध्ये मराठी संस्कृती, परंपरा आणि लोककलेची ओळख अधिक भक्कम करावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम यंदा परभणीत रंगणार आहे. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी, परभणी शाखेतर्फे कौस्तुभ मंगल कार्यालय, कारेगाव रोड येथे या लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून परिषद अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या विशेष उपस्थितीची नोंद राहणार आहे.

महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा वारसा बालमनात रुजविणे, त्यांना गायन–वादन–नृत्य या कलांमध्ये प्रोत्साहन देणे आणि लोककलांबाबत अभ्यासाची प्रेरणा देणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. राज्यातील बालकलावंतांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या बालरंगभूमी परिषदेचा हा उपक्रम दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो.

महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकनृत्य, एकल लोकगीत गायन, लोकवाद्य वादन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

सहभागी सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. समूह स्पर्धांसाठी सर्वोत्कृष्ट : ₹3000 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र, उत्कृष्ट : ₹3000 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र, उत्तम : ₹2000 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र, प्रशंसनीय : ₹1000 + प्रमाणपत्र असे पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.

एकल स्पर्धांसाठी सर्वोत्कृष्ट : ₹2000 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र, उत्कृष्ट : ₹1500 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र, उत्तम : ₹1000 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र, प्रशंसनीय : ₹500 + प्रमाणपत्र असे आहेत.

जिल्ह्यातील बालकलावंतांनी आपल्या विद्यालयामार्फत संपर्क व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, परभणी शाखेतर्फे करण्यात आले आहे. संपर्कासाठी राजू वाघ – 86002 47171, सचिन आढे – 92847 78897, दिनकर दशपांडे – 97664 88892, संदीप राठोड – 98818 07890, कुलदीप उंडाळकर – 99605 57697, शैलेश ढगे – 82758 29979, लक्ष्मीकांत जोगेवार – 95116 03933 यांच्याकडे संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande