
रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातर्फे रत्नागिरीकरांसाठी सकाळच्या वेळात नि:शुल्क योग प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन १० दिवसीय निःशुल्क योग प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस प्रथमच सकाळच्या सत्रात योग प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय ही दहा दिवसीय योग कार्यशाळा पूर्ण निःशुल्क असेल.
ही योग कार्यशाळा १ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ७ ते ८ या वेळेत शहरातील अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
याआधी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे संध्याकाळच्या वेळेत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नोकरदार व महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सकाळच्या वेळेतील योग वर्गाचा फायदा विद्यार्थी, महिला व नोकरदार वर्गाला होणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी प्रा. पल्लवी वंजारी (8308242570) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://forms.gle/FkeejPUxsdspJsLC7 या लिंकचा उपयोग करावा. सर्व रत्नागिरीकरांनी या योग वर्गाचा लाभ घ्यावा व आरोग्य दृढ करावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी