
नांदेड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।
नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत जनजागृती संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणातर्गंत या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवकांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत आहे. ही एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 9 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारी पोस्टर्स, पोम्लेटचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम बस स्थानक प्रमुख यासीन खान यांच्या उपस्थित घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, समुपदेशक प्रकाश आहेर व सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड तसेच जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक येथील लिपिक सुरेश फुलारी, गुलाब रब्बानी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis