
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात जळीत रूग्ण दाखल होतात. मात्र, उन्हाळा व हिवाळ्यात जळीत रूग्णांचे प्रमाण हे अधिक असतात. आंतररूग्ण विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांमध्ये जळीतच्या सरासरी प्रमाणावरून रूग्णांचे वाचण्याचे प्रमाण असते. मात्र, या रूग्णालयातील सी वॉर्डात जळीतचे 22 बेड आहेत. येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांवर उच्च दर्जाचे सर्व प्रकारचे उपचार केले जातात. बाराशे रूग्णांसाठी एक कोटी रूपयांच्या औषधांचा वापर करावा लागतो.
या रूग्णालयात शहर-जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यातील विविध ठिकाणावरुन तर विजयपूर, कलबुर्गी, बिदर (कर्नाटक) व तेलंगणातील जळीत रूग्ण येथे येतात. या रूग्णालयातील जळीत रूग्णांसाठी लागणारे सर्व प्रकारची औषधांसह रक्त व प्लाझमा यासह कृत्रिम त्वचेचाही वापर अनेक वेळा केला जातो. हिवाळा व उन्हाळ्यात याचे रूग्ण वाढतात. 22 बेडच्या वॉर्डात कायम आठ ते दहा रूग्णांवर महात्मा फुले व पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात. लहान मुले व वृध्द नागरिक जर 35 टक्के जळीत असतील पन्नास टक्के वाचण्याचे प्रमाण असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड