
सोलापूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची अवस्था बिकट असून, त्यांना नगरपालिकेत उभा करायला उमेदवार सापडले नाहीत. मग अशा पक्षांना कशाच्या भरवशावर मत देणार असा सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवेढा येथे बोलताना व्यक्त केला.
अध्यक्षस्थानी आ. समाधान आवताडे हे होते. यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, यापूर्वी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमळ चिन्हाचा उमेदवार विजयी झाला नव्हता. सध्या राष्ट्रवादीच्या तुतारीची अवस्था अतिशय बिकट असून, त्यांना उभा करायला उमेदवार नाही. अशी तुतारी वाजवणार कोण तशीच अवस्था काँग्रेसची आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या प्रदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. तिथे स्थानिक लोकप्रतिनिधीतील इथे नाहीत काँग्रेसला काँग्रेसच्या चिन्हावर उभा करायला उमेदवार देखील सापडले नाहीत. उबाटाची अवस्था चष्मा लावून बघितले तरी दिसत नाही. अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या पक्षाची ग्रामविकास मंत्री यांनी खिल्ली उडवत. राज्यात महायुती विकासाचे एक व्हिजन घेऊन आपणा सर्वांसमोर येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड