पाटोदा तालुक्यातील सौताडा व भुरेवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचाली
आ. सुरेश धस यांच्या सूचनेनंतर वन विभागाकडून अत्याधुनिक एनायडर यंत्रणा बसवली जाणार बीड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। पाटोदा तालुक्यातील सौताडा व भुरेवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींनी शेतकरी पुन्हा दहशतीत आले आहेत. शेळी-बोकड हल्ल्यानंतर सौताड
पाटोदा तालुक्यातील सौताडा व भुरेवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचाली


आ. सुरेश धस यांच्या सूचनेनंतर वन विभागाकडून अत्याधुनिक एनायडर यंत्रणा बसवली जाणार

बीड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

पाटोदा तालुक्यातील सौताडा व भुरेवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींनी शेतकरी पुन्हा दहशतीत आले आहेत. शेळी-बोकड हल्ल्यानंतर सौताडा येथील शेतकरी राजू सानप यांच्या गायीचा बिबट्याने फडशा पाडला. आ. सुरेश धस यांच्या सूचनेनंतर आता वन विभागाकडून अत्याधुनिक एनायडर यंत्रणा दोन ठिकाणी बसवली जाणार आहे.

एनायडर ही यंत्रणा मनुष्य आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष कमी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. प्राणी विशिष्ट भागात आला की यातील सेन्सर त्याचा मागोवा घेतात आणि लगेच तेजस्वी प्रकाश व मोठा आवाज निर्माण करून त्या प्राण्याला घाबरवतात. दूर पाठवतात. जुन्नर (पुणे) आणि पिलीभीत (उत्तर प्रदेश) या भागांत या यंत्रणेचा यशस्वी वापर झाल्याने हल्ल्यांची संख्या घटली आणि शेतकऱ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. असे सांगितले जाते.

आष्टी व पाटोदा वनपरिक्षेत्रात मिळून बिबट्यांची संख्या १५ ते २० च्या आसपास असावी, असा अंदाज

असला, तरी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही संख्या दुप्पटही असू शकते. बहुतेक सर्व बिबटे नरभक्षक नसले तरी अलीकडे ते पशुधनावर सलग हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान,एनायडरच्या दोन मशीनची मागणी केली आहे. त्या येताच सौताडा व भुरेवाडी परिसरात बसवल्या जातील. बिबट्याचा वावर गंभीर आहे. शेतकऱ्यांचा जीव व पशुधन दोन्ही धोक्यात आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने एनायडर मशीन बसवून परिसर सुरक्षित करावा, असे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही भीती वाटू नये, म्हणून प्रत्येक पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. असे आ. सुरेश धस यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande