परभणी : नगराध्यक्षपदासाठीचे 34 अर्ज नामंजूर
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांची छाननी पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 117 उमेदवारी अर्जांपैकी 83 अर्ज पात्र,
परभणी : नगराध्यक्षपदासाठीचे 34 अर्ज नामंजूर


परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांची छाननी पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 117 उमेदवारी अर्जांपैकी 83 अर्ज पात्र, तर 34 अर्ज नामंजूर झाले.

त्याचप्रमाणे सदस्य पदासाठी दाखल झालेल्या 1209 अर्जांपैकी 859 अर्ज पात्र, तर 350 अर्ज छाननीत बाद झाले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी बाद झालेले अर्ज (एकूण 34) गंगाखेड : 4, सेलू : 6, मानवत : 3, पाथरी : 3, सोनपेठ : 6, पुर्णा : 12 तर सदस्यपदासाठी बाद झालेले अर्ज (एकूण 350) गंगाखेड : 21, जिंतूर : 36, सेलू : 69, मानवत : 30, पाथरी : 68, सोनपेठ : 53, पुर्णा : 73

छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्षपदासाठी गंगाखेडात 14, जिंतूरात 11, सेलूत 9, मानवत 4, पाथरीत 19, सोनपेठात 10 आणि पूर्णेत 16 अशी 83 उमेदवारी अर्ज पात्र ठरले. तर सदस्यपदासाठी गंगाखेड 169, जिंतूर 94, सेलू 145, मानवत 87, पाथरी 133, सोनपेठ 90 आणि पुर्णा 141 असे एकूण 859 अर्ज वैध ठरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande