पुणे मनपाने थांबवले नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)शहरात रस्ते खोदाई करताना नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम महापालिकेने स्थगित केले आहे. खोदकाम केलेले रस्ते आधी दुरुस्त करा, फोटोसह त्याचा अहवाल सादर करा, मगच पुढची परवानगी दिली जाईल, अशी नोटीस पथ विभागाने ठेकेदाराला बजावली आ
पुणे मनपाने थांबवले नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम


पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)शहरात रस्ते खोदाई करताना नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम महापालिकेने स्थगित केले आहे. खोदकाम केलेले रस्ते आधी दुरुस्त करा, फोटोसह त्याचा अहवाल सादर करा, मगच पुढची परवानगी दिली जाईल, अशी नोटीस पथ विभागाने ठेकेदाराला बजावली आहे.

शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यासाठी गृह विभागाने निविदा मंजूर केली आहे. त्यासाठी ठेकेदाराकडून केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जात आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षासाठीही भूमिगत केबल टाकण्याचे काम स्वतंत्रपणे सुरू आहे. सीसीटीव्हीसाठी रस्ते खोदाई केल्यानंतर दुरुस्तीचे काम महापालिकेचे आहे. तर आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी केल्या जाणाऱ्या खोदाईनंतर रस्ते दुरुस्तीचे काम हे संबंधित ठेकेदाराने करणे आवश्‍यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande