पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)पीएमपीच्या ताफ्यात येत्या चार ते पाच महिन्यांत दोन हजार नवीन बस दाखल होणार आहेत. सद्य:स्थितीत असलेल्या दोन हजार बसची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात एकूण बसची संख्या चार हजार होणार आहे. बसची संख्या वाढणार असल्याने प
PMPML


पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)पीएमपीच्या ताफ्यात येत्या चार ते पाच महिन्यांत दोन हजार नवीन बस दाखल होणार आहेत. सद्य:स्थितीत असलेल्या दोन हजार बसची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात एकूण बसची संख्या चार हजार होणार आहे. बसची संख्या वाढणार असल्याने पीएमपी प्रशासनाने प्रवासीसंख्या जवळपास दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. पीएमपीची दैनंदिन प्रवासीसंख्या २० लाख होईल, या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने नियोजनाला सुरुवात केली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सद्यस्थितीत दोन हजार बस असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र १६५० बस रस्त्यावर धावत आहेत. यातून दैनंदिन सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या अनेक दिवसांपासून पीएमपी प्रशासन प्रवाशांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र बसची संख्या मर्यादित असल्याने प्रवासी संख्या वाढविण्यास अडचणी येत होत्या. आता मात्र पीएमपी प्रशासनाला दोन हजार नवीन बस मिळणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande