
पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर व मुंबई विभागाचे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजगुरु ह. म. पंडित विद्यालय, सफाळे व टिमा यांच्या सहकार्याने विभागस्तरीय युवा महोत्सव सन 2025-26 भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन टिमा हॉल, बोईसर येथे केले. स्पर्धेत विविध कला, कौशल्य आणि नवोपक्रमाचे दर्शन या महोत्सवात घडले. उद्घाटन प्रसंगी पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड उपस्थित होत्या.
या युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागात समूह लोकनृत्य व समूह लोकगायन यांसारख्या पारंपरिक कलांना मुला-मुलींनी दिमाखदार सादरीकरणातून उजाळा दिला. तर नवोपक्रम विभागात विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सुंदर दर्शन घडविले. कौशल्य विकास विभागात कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि कविता लेखन अशा सर्जनशील स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची उत्तम छाप पाडली. युवा महोत्सवातून युवकांना आपली कला, बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष कौशल्ये सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले.
कविता लेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक - प्रिया राठोड पालघर
द्वितीय क्रमांक - मृणाली पाटील ठाणे
तृतीय क्रमांक - पूजा पांडे मुंबई उपनगर
कथालेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक - ईशांत मेहरा ठाणे
द्वितीय क्रमांक - पूजा पांडे मुंबई उपनगर
तृतीय क्रमांक - मनाली चौधरी मुंबई उपनगर
वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक - आशुतोष शुक्ला पालघर
द्वितीय क्रमांक - पूजा पांडे मुंबई उपनगर
तृतीय क्रमांक - अंश राय पालघर
चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक - कशिश गणेश तिखे रायगड
द्वितीय क्रमांक - विकास राजभर ठाणे
तृतीय क्रमांक - जीनल माच्छी पालघर
विज्ञान व तंत्रज्ञान स्पर्धा
प्रथम क्रमांक - बी एन बांदोडकर सीनियर कॉलेज ठाणे
द्वितीय क्रमांक - बी एन बांदोडकर ज्युनिअर कॉलेज ठाणे
तृतीय क्रमांक - होली चाइल्ड सीबीएससी स्कूल रायगड
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL