पालघर - जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे ‘परिवर्तन’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे ‘परिवर्तन’ या उपक्रमांतर्गत आयोजित सफाळे विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी देवभूमी सभागृह, सफाळे (पूर्व) येथे पार पडला. संस्थेचे संस्थापक अध
जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे ‘परिवर्तन’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात


पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे ‘परिवर्तन’ या उपक्रमांतर्गत आयोजित सफाळे विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी देवभूमी सभागृह, सफाळे (पूर्व) येथे पार पडला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत राऊत, कार्याध्यक्षा भाग्यश्री राऊत गोंधळेकर आणि चिटणीस त्रिशीला राऊत यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. सफाळे विभागातील शाळा व महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेला लाभला.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष कुंदन राऊत, राजन गरुड, प्राचार्य किरण सावे यांच्या मार्गदर्शनाखाली तर रूपाली भोईर, प्रीती राऊत, उल्हास सोगले, मेघना भोईर, अनंत कडू, महेंद्र पाटील, अल्पेश घरत, हर्षदा घरत, हनिषा पाटील आदी कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण माजी उपप्राचार्या माधुरी बुधकर, प्राध्यापिका दर्शना चौधरी, प्राध्यापिका सुप्रिया राऊत, प्राध्यापिका श्रेया पांचाळ, रोशन घागस, माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोईर आणि वझे गुरुजी यांनी केले.

प्राथमिक गटातून अभिज्ञ राजन गरुड (सफाळे), उच्च प्राथमिक गटातून दुर्वा ठाकूर (आगरवाडी), माध्यमिक गटातून आर्या पाटील (आगरवाडी), महाविद्यालयीन गटातून सिद्धी घरत (आगरवाडी), शिक्षक गटातून सुशील ठाकूर (आगरवाडी) व पालक गटातून सुप्रिया योगेंद्र गौंड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांचा सन्मान सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन झाला.

या प्रसंगी निवृत्त शिक्षक वझे गुरुजी तसेच शिक्षिका स्वेजल म्हात्रे यांना ‘आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मंचावर मराठी भाषा अभ्यासक सुशील शेजुळे, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन राऊत, चंदुलाल घरत, पुरुषोत्तम पाटील, माजी सैनिक भानुदास वैद्य, पारगाव केंद्रप्रमुख प्रभाकर भोईर, नवघर केंद्रप्रमुख प्रकाश भोईर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करत अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, अशी भावना व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande