पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता
पिंपरी, 20 नोव्हेंबर (हिं.स.) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली,बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्रावण हर्डीकर होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध
PCMC


पिंपरी, 20 नोव्हेंबर (हिं.स.) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली,बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्रावण हर्डीकर होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत दत्तनगर ते वडमुखवाडी ते काटे वस्ती बी आर टी मार्गांवरील हमी कालावधी संपलेले एल ई डी दिवे बदलणे, ग व फ क्षेत्रीय विद्युतविभागाचे प्रपत्रात नमूद विकासकामांचे अवलोकन करणे,पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत तरतूद वर्ग करणे,मे. आवडी महिला बचत गट व मे. गायत्री महिला बचत गट यांचे सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता व देखभाल दुरुस्ती कामास मुदतवाढ देणे,प्रभाग क्र. ३ चऱ्होली अंतर्गत पठारे मळा,पीर दर्गा परिसरातील डीपी रस्त्यावर विद्युत विषयक कामे करणे,महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार याद्यांचे कंट्रोल चार्ट तयार करण्यासाठी संगणक प्रणाली खरेदी करणे,प्रभाग क्र. ११ मधील मथुरा स्वीट ते स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल पर्यंत स्टोर्म वॉटर लाईन टाकणे व अनुषंगिक कामे करणे,मुख्य लेखापरीक्षक विभागातील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे,मुख्य अग्निशमन केंद्र,संत तुकाराम नगर व नवीन तालेरा रुग्णालय चिंचवड येथे आयपीपी- बीएक्स/ई पीएबीएक्स यंत्रणेसाठी नवीन पी आर आय लाईन घेणे,अर्जित रजा/ सह पूर्णवेतनी परवर्तीत रजा/ अर्ध वेतनी रजा खर्ची टाकून मंजुरी देणे,ह क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील नवी दिशा. योजना अंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छता व देखभाल कामकाज थेट पद्धतीने देण्यात आलेल्या कामास मुदतवाढ देणे,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व आयोजन खर्चास मान्यता देणे,क क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत नेहरूनगर स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनीचे १८ महिन्याकरिता चालन व देखभाल दुरुस्ती करणे,इंद्रप्रभा सोसायटी नवीन झालेल्या डीपी रस्त्याला अडथळा ठरणारे ई एच व्ही टॉवर शिफ्ट करणे,महापालिकेच्या विविध विभागामध्ये इंटरनेट बँडविथ सेवा उपलब्ध करून देणे कामास मुदतवाढ देणे,प्रभाग १८ मधील सार्वजनिक शौचालये व मुत्रालये देखभाल दुरुस्ती करणे व स्थापत्य विषयक कामे करणे,प्रभाग क्र. १८ मधील चिंचवड परिसरात स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्ती व नागरिकांनी सुचविलेली स्थापत्य विषयक कामे करणे,प्रभाग क्र ३० मधील फुगेवाडी व कासारवाडी मधील विविध भागातील मनपाच्या कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था पुरविणे व फर्निचर साहित्य पुरविणे,प्रभाग क्र. २० येथे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंडप व्यवस्था करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,कासारवाडी स्तरावर किरकोळ दुरुस्तीची व देखभाल कामे करणे,महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप उपक्रम राबविणे व येणाऱ्या खर्चास मान्यता देणे,महापालिकेतील मैलाशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन मधील सिमाभिंतीची देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे,महापालिकेतील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये स्थापत्य विषयक कामे करणे आदि विषयांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande