
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी एक नगराध्यक्षपदाचा, तर १४ उमेदवारांनी सदस्यपदाचे अर्ज मागे घेतले.निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी या अर्जांची छाननी झाली. यात नगराध्यक्षपदासाठीचे २५ तर सदस्यपदाचे ४०४ अर्ज बाद झाले. त्यानंतर बुधवारपासून वैध ठरलेले अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवारपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
लोणावळा नगरपरिषदेसाठीचे काँग्रेसचे सुभाष सोनावणे यांनी अर्ज माघारी घेतला. तर सदस्यपदाच्या रिंगणातून बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उमेदवाराने, लोणावळा येथील चार, दौंड येथील एक, तळेगाव दाभाडे येथील दोन, चाकण आणि शिरूर येथील प्रत्येकी एक तर जुन्नर आणि राजगुरुनगर येथील प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु