पुणे जिल्ह्यात दोन सायन्स पार्कची जागा निश्चिती लवकरच
पुणे, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुण्यात दोन सायन्स पार्क केले जाणार आहेत. त्यासाठी पाच गावांमधील जागेची पाहणी करण्यात आली असून, दळणवळणासह इतर सुविधा पाहून त्यापैकी दोन गावांची सायन्स पार्कसाठी निवड केली जाणार आहे. या प्र
ZP pune


पुणे, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुण्यात दोन सायन्स पार्क केले जाणार आहेत. त्यासाठी पाच गावांमधील जागेची पाहणी करण्यात आली असून, दळणवळणासह इतर सुविधा पाहून त्यापैकी दोन गावांची सायन्स पार्कसाठी निवड केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी वीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जिल्हा परिषद तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध नवनवीन आविष्कार करता येण्याच्या उद्देशाने सायन्स पार्क केले जाणार आहेत. या सायन्स पार्कची उभारणी आणि त्याचा इतर अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बंगळूरमधील अगस्त्य फाउंडेशनच्या प्रकल्पाला नुकतीच भेट दिली.

औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारीचा (सीएसआर) निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. दोन्ही प्रकल्पाच्या जागा निश्चितीनंतर आठ महिन्यांत बांधकाम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले आहे. सायन्स पार्कमध्ये विद्यार्थी तीन दिवस राहू शकतात. विद्यार्थ्यांना कृती आधारित शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. पहिले पाच वर्षे संबंधित फाउंडेशनकडून आपल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर जिल्हा परिषदेकडे पूर्णपणे हस्‍तांतरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील पाच गावांपैकी लवकरच दोन गावांची निवड करून प्रत्यक्ष सायन्स पार्कसाठी काम सुरू केले जाईल. पार्कसाठी भव्‍य इमारतीची आवश्यकता नसून, मोकळ्या पण पर्यावरणपूरक मोजक्‍याच इमारती असतील. फाउंडेशनसोबत सामंजस्य करार झाला असून, पहिले पाच वर्ष आपल्या शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्याचबरोबर तांत्रिक सहकार्य ही त्यांच्याकडून मिळणार आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande