पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण पूर्ण, आता प्रवास होणार सुपरफास्ट
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। मध्य रेल्वे विभागातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला पुणे-मिरज या २८० किलोमिटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार असून, या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प
Railway


पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। मध्य रेल्वे विभागातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला पुणे-मिरज या २८० किलोमिटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार असून, या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची अधिक सोय होणार आहे.पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. आता भविष्यात रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार आहे.मध्य रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१६ मध्ये सुरू झाला. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ६ नोव्हेंबरला (सीएमआर) पाहणी करून मार्गावर रेल्वेची चाचणी घेतली. यावेळी १३० किमी प्रतीतास वेगाने गाडी धावली. त्यानंतर दुहेरीकरण पूर्ण झाल्याने प्रवासी वाहतुकीबरोबरच, मालवाहतूक गाड्यांचा वेग वाढणार आहे.पुणे-मिरज मार्गावरील कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अखेरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.

----------------

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande