जळगाव - सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभांसाठी हजर राहण्याचे आदेश
जळगाव, 20 नोव्हेंबर (हिं.स.) भुसावळ येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी ज्ञानेश्वर राजधर पाटील सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय, भुसावळ (पत्ता-रा. द्वारा/ दिनेश मधुकर भामरे, केले नगर, भाग-1, प्लॉट नं. 44, एसआर
जळगाव - सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभांसाठी हजर राहण्याचे आदेश


जळगाव, 20 नोव्हेंबर (हिं.स.) भुसावळ येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी

ज्ञानेश्वर राजधर पाटील सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय, भुसावळ (पत्ता-रा.

द्वारा/ दिनेश मधुकर भामरे, केले नगर, भाग-1, प्लॉट नं. 44, एसआरपी कॉलनी, देवपूर, धुळे

जि. धुळे) यांचे 26 जुलै 2025 रोजी निधन झाल्याची माहिती समाजमाध्यमाद्वारे कार्यालयास

प्राप्त झाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे प्रलंबित लाभ देण्यासाठी त्यांच्या कायदेशीर

वारसांचा तपशील उपलब्ध नसल्याने ही सार्वजनिक नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

वारसांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत अर्जदाराचा पासपोर्ट

आकाराचा फोटो,मृत्यू दाखला (मूळ व प्रत), ओळखपत्र व पत्ता पुरावा, वारस प्रमाणपत्र/कुटुंब

प्रमाणपत्र व संमतीपत्र, मूळ सेवा पुस्तक, बँक पासबुकची प्रत या आवश्यक कागदपत्रांसह

तहसील कार्यालय, भुसावळ येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर राहावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande