
अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)
युवा स्वाभिमान पार्टीच्या शक्तीवर्धनाला आणखी जोर मिळाला असून अंजनगाव सुर्जीव चांदुर बाजार परिसरातील उद्धव ठाकरे गटातील महत्त्वाचे कार्यकर्ते आणि शेकडो समर्थकांनी युवा स्वाभिमान पार्टीत मध्ये जाहीर प्रवेश केला. वायएसपीचे मार्गदर्शक सुनिल राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात हा भव्य प्रवेश सोहळा पार 1. या मोठ्या प्रवेशामुळे अंजनगावसुर्जी व चांदुर बाजार येथील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अंजनगाव सुर्जी उ.बा. ठा. गटाच्या माजी शहराध्यक्षा रजनी प्रशांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वायएसपी मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर आ. गजानन लवटे यांचे पुतणे चंद्रकांत उर्फ बंटी लवटे यांनीही जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर मार्गदर्शक सुनिल राणा व राष्ट्रीय कार्यकारणीद्वारे बंटी लवटे यांना उमेदवारी जाहीर करून मानाचा बहुमान दिला. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी कार्यकारिणीच्या प्रमुख
उपस्थितीत मार्गदर्शक सुनिल राणा यांनी सर्व नवीन उमेद्वार, कार्यकर्ते व समर्थकांचे स्वागत केले. प्रवेशाप्रसंगी निळकंठ कात्रे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, प्रा. अजय गाडे, हरिश चरपे, गंगाधर आवारे, अजय देशमुख, आशिष कावरे, अजय घुले, संजय हिगासपुरे, मंगेश कोकाटे, पवन हिगणे, निलेश देशमुख, जिवन चर्ऱ्हाटे, सुवर्णा चरहाटे, संजय नाठे, मयुर श्रीवास्तव, गौरव व्यवहारे, देवेंद्र व्यवहारे, लतिका लाडोळे, भावना नांदरेकर, सागर दायमा, डॉ. राहुल अहिर, सुबोध वासनकर, अवि नानवंशी, अजयनानवंशी, संकेतराऊत, धनुशतायडे, प्रतिभायादव, कांचननांदरेकर, सिमातायडे, सुधिर तायडे, विवेक चर्जन, पद्मादुबे, राहुल बलिगे, दिप बोरवार, दिगांबर गायकवाड, विजय राऊत, यश मनगठे, शितल बुरघाटे, कल्पना वर्मा, गोपाल लाडोळे, प्रशांत पाटील, वामनराव भावे, संगिता सिनकर, विलास दुबे, राजु अस्वार, रेखा सोनटक्के, ईश्वर पाटील, मोहन अतकर, सतिश साहु, निशालवटे, साहिल गौर, ओम भट, आदित्य गवई, प्रकाश गवई, प्रेमलाल रॉय, अक्षय ताटेकर, हितेश इंगळे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी