सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणार ५३ कोटींची कामे
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा जोर वाढला आहे. शासनाच्या विविध योजनांतून ५३ कोटींमधून २५७ विकासकामे मंजूर झाली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जा
smc


सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा जोर वाढला आहे. शासनाच्या विविध योजनांतून ५३ कोटींमधून २५७ विकासकामे मंजूर झाली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जात असून या कामांच्या जोरावर मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करीत आहेत.

जिल्हास्तरीय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर नागरी वस्ती सुधारणा योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून शहरातील रस्ते आणि सभामंडप बांधकामाकरिता तब्बल ५३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तब्बल २५७ कामे होणार आहेत. निवडणुका लागल्या की रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुविधा, गटारींचे आधुनिकीकरण, स्मार्ट लायटिंग यांसह काही महत्त्वाच्या प्रभागांतील प्रलंबित कामांना गती देण्यात येते. काही प्रभागांमध्ये अनेक महिने प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना अचानक हिरवा कंदील दिला जातो. या निधीतून प्रभागामध्ये पायाभूत सुविधा देण्यावर कार्यकर्त्यांचा भर आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ५३ कोटींच्या विकासकामांचा बार उडणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande