सोलापूर - महिलांच्या सुरक्षितता आणि गोपनियतेबद्दल जागरुकता मार्गदर्शन शिबीर संपन्न
सोलापूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मा. मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तदर्थ जिल्हा न्यायाधीश
सोलापूर - महिलांच्या सुरक्षितता आणि गोपनियतेबद्दल जागरुकता मार्गदर्शन शिबीर संपन्न


सोलापूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मा. मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या आणि महिलांच्या सुरक्षितता व गोपनियतेच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीची नितांत गरज असल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने युगंधर महिला वैद्यकिय महाविद्यालय, सोलापूर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबीरात तदर्थ जिल्हा न्यायाधीश मा. एस. व्ही. केंद्रे यांनी पॉक्सो कायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत दैनंदिन जीवनातील सोशल मिडीया, वाढत्या मोबाईलचा वापर, बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतूदींचे स्पष्टीकरण दिले. तसेच महिलांच्या सुरक्षितता व गोपनियतेच्या पार्श्वभुमीवर जनजागृती या विषयावर मार्गदर्शन करताना विधीज्ञ देवयानी किणगी यांनी कायदेशीर उपाय सोप्या भाषेत मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश क. स्तर, सोलापूर श्री. डी. जी. कंखरे, युगंधर वैद्यकिय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वर्षा पगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

--------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande