बूथस्तरावरची बांधणी मजबूत करून विजय पक्का करा;  सपकाळ यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.) प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मांडले.“काँग्रेस ही लोकशाही मूल्यांची रक्षणकर्ता आणि जनतेच्या प्रश्नांची खरी लढवैय्या संघटना आहे. बूथस्तरावरची बांधणी मजबूत असेल, तर व
बूथस्तरावरची बांधणी मजबूत करून विजय पक्का करा   प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे कार्यकर्त्यांना सूचना


अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.) प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मांडले.“काँग्रेस ही लोकशाही मूल्यांची रक्षणकर्ता आणि जनतेच्या प्रश्नांची खरी लढवैय्या संघटना आहे. बूथस्तरावरची बांधणी मजबूत असेल, तर विजय निश्चित आहे,” असे ते म्हणाले.

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक चांदूर रेल्वे येथे अत्यंत उत्साहात आणि प्रचंड गर्दीत पार पडली. विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे ही बैठक ऐतिहासिक ठरली. मतदारसंघातील सर्व भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काँग्रेसची संघटनशक्ती आणि आंतरिक एकजूट याची प्रभावी प्रचिती दिली.

मंचावर खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर, माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे यांसह सर्व प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांची उपस्थिती लाभली.

चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूनमताई सूर्यवंशी, धामणगाव रेल्वे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. वर्षा देशमुख, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. विना जाधव तसेच युवक काँग्रेस प्रभारी अक्षय राऊत उपस्थित होते.खासदार बळवंत वानखडे, श्रीकांत गावंडे व इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवडणूक शिस्त, समन्वय आणि संघटनात्मक बांधणीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला गणेश आरेकर, परीक्षित जगताप, श्रीकांत गावंडे, गोविंदराव देशमुख, अमोल होले, पंकज वानखडे, नवीन कनोजीया, प्रदीप मुंदडा, वसंतराव देशमुख, मोहन शिंगवी, संजय शेंडे, अजय तुपसुंदरे, अतुल चांडक, अशोक भैया जयस्वाल, निशु जाधव, अमोल धावसे, कविताताई गावंडे, इद्रिसभाई, अजमतभाई, श्रीनिवास सूर्यवंशी, अक्षय होले यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

“महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे हक्क, युवकांच्या संधी आणि सर्वांगीण विकास हे काँग्रेसचे मुख्य ध्येय आहे,” हाच विचार समाजामध्ये पोचून काँग्रेसचे संघटन मजबूत करा व स्थानिक स्वराज्य संस्था तेव्हा झेंडा फडकवा

माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर

आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकीवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे याकरिता सर्वांनी निर्धार करायला पाहिजे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा या विजयाचा शिलेदार असेल जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख

“धामणगाव–चांदूर रेल्वे परिसरात केलेली विकासकामे ही काँग्रेसच्या कार्यपद्धतीची साक्ष आहेत. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये सतत राहून विश्वास दृढ केल्यास जनता पुन्हा एकदा काँग्रेसलाच साथ देईल,”

माजी आमदार वीरेंद्र जगताप

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande