परीक्षार्थींसाठी 'टीईटी'त यंदा प्रथमच 'फोटो व्ह्यू' प्रणालीचा वापर
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (टीईटी) परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थींचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने ‘फ्रिस्किंग’ केले जाणार आहे. परीक्षेदरम्यान होणारे
परीक्षार्थींसाठी 'टीईटी'त यंदा प्रथमच 'फोटो व्ह्यू' प्रणालीचा वापर


पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (टीईटी) परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थींचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने ‘फ्रिस्किंग’ केले जाणार आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कोणताही विद्यार्थी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या उपाययोजना केल्या आहेत. ‘टीईटी’ परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने यंदा काटेकोर उपाययोजनांवर भर दिला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या रविवारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ आयोजित केली आहे. राज्यातील ३७ जिल्हा स्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक हजार ४२३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी एकूण चार लाख ७५ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पहिल्या पेपरसाठी दोन लाख तीन हजार ३३४ आणि पेपर दोनसाठी दोन लाख ७२ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande