हिंगोली - जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिली ई-केवायसी कॅम्प, महसूल कार्यालये व शाळांना भेट
हिंगोली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय उपक्रम, महसूल कार्यालये तसेच जिल्हा परिषद शैक्षणिक संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात तसेच
आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


हिंगोली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय उपक्रम, महसूल कार्यालये तसेच जिल्हा परिषद शैक्षणिक संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

नागरिकांना शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

जिल्हाधिकार्‍यांनी बासंबा आणि नरसी येथील ई-केवायसी कॅम्पची पाहणी करत लाभार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला. नागरिकांना अडथळेविना सेवा मिळावी तसेच कामकाजात गती आणावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

सेनगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात भेट देऊन प्रलंबित कामकाज, नोंदणी प्रक्रिया व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तपासणी करण्यात आली. महसूल विषयक प्रकरणे वेळेवर निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

पेडगाव व नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षणाची गुणवत्ता, शालेय सुविधा, स्वच्छता व पोषण आहार यांचा आढावा घेतला. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व विभागांनी लोकाभिमुख व पारदर्शक कामकाजावर भर देत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक परिणामकारक बनवाव्यात, असे आवाहन यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande