अमरावती : आगामी पं. स. जि. प. निवडणूक वंचित ताकदीने लढणार
अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुकाचे वतीने तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व ताकद पणाला लावून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकित
आगामी पं. स. जि. प. निवडणूक वंचित ताकदीने लढणार


अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुकाचे वतीने तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व ताकद पणाला लावून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकित वंचित बहुजन आघाडीचे वतीने ताकदीने लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत केला आहे.

तिवसा स्थित शासकिय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, तालुका अध्यक्ष मनीष खरे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन जोगे, तालुका महासचिव अमोल जवंजाळ प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असून सर्वसामान्य जनतेचा आवाज सभागृहात पोहचविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहून पक्षाचा विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बांधलेली वज्रमुठ हीच आगामी परिवर्तनाची ताकद असल्याचे मत युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी व्यक्त केले.

आढावा बैठकीला तालुका महासचिव अनिल सोनोने, प्रवीण निकाळजे, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, नितीन थोरात, राहुल पखाले, सह तालुक्यातील सर्कल निहाय जेष्ठ कार्यकर्ते- युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande