शेकोटी पेटवल्यास पुणे मनपाकडून दंडात्मक कारवाईचा इशारा
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।थंडी वाढली आहे. त्यामुळे खासगी, सरकारी कार्यालये, आस्थापना, गृहप्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर, सार्वजनिक ठिकाणांवर शेकोट्या पेटवून त्याभोवती ऊब घेणारे नागरिक बसल्याचे चित्र दिसू लागले आहे. पण आता यापुढे कुठेही शेकोटी पेटव
शेकोटी पेटवल्यास पुणे मनपाकडून दंडात्मक कारवाईचा इशारा


पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।थंडी वाढली आहे. त्यामुळे खासगी, सरकारी कार्यालये, आस्थापना, गृहप्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर, सार्वजनिक ठिकाणांवर शेकोट्या पेटवून त्याभोवती ऊब घेणारे नागरिक बसल्याचे चित्र दिसू लागले आहे. पण आता यापुढे कुठेही शेकोटी पेटविल्याचे निदर्शनास आले, तर महापालिकेडून कारवाई केली जाणार आहे. शेकोट्यांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणारे नागरिक, विद्यार्थी यांबरोबरच खासगी, सरकारी कार्यालये, आस्थापना, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले अशा विविध ठिकाणी शेकोटी पेटविण्यास सुरुवात झाली आहे. शेकोटी पेटविण्यासाठी लाकूड, कचरा, कोळसा, प्लॅस्टिकच्या वस्तू जाळल्या जातात. त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande