
मालेगाव, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खुनाची घटना ही वेदनादायी व धक्कादायक आहे. या दु:खात शासन पिडीत कुटूंबाच्या पाठीशी असून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी खटला जलद न्यायालयात चालविण्यात येणार आहे व त्यासाठी चांगला वकील देण्यात येईल. तसेच यासाठी आवश्यक ती मदत व पाठपुरावा करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी पिडीत कुटूबियांचे सांत्वनपर भेटीत दिले.
यावेळी बालिकेच्या कुटूंबियांनी व ग्रामस्थांनी आरोपीस कठोर शिक्षा देऊन पिडीतेस व कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी बालिकेच्या कुटूंब व ग्रामस्थांनी मंत्री श्री. महाजन यांच्याकडे केली. यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी पिडीत कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना धीर दिला व त्यांच्याशी संवाद साधला.तत्पूर्वी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही पीडित कुटुबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटूबियांना धीर दिला व शासन कुटूबियांच्यासोबत असल्याचे सांगितले.यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, तहसीलदार विशाल सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV