पनवेल येथे चंदू काका सराफ फॅशन शो च्या विजेत्यांचा गौरव
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।पनवेलमध्ये चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित भव्य फॅशन शो २०२५ उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेटे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ‘तस्मै’ या लग्नसोहळा थीमव
ग्लॅमर आणि स्टाइलचा जल्लोष; चंदू काका सराफ फॅशन शो २०२५मध्ये विजेत्यांचा गौरव


रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।पनवेलमध्ये चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित भव्य फॅशन शो २०२५ उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेटे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ‘तस्मै’ या लग्नसोहळा थीमवरील विशेष सेगमेंटचे तसेच संपूर्ण शोचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत प्रेक्षक, मान्यवर आणि फॅशन रसिकांनी सभागृह भरून गेले होते.

या सोहळ्याला चंदू काका सराफ पनवेल शाखेचे व्यवस्थापक अमेय जोशी, सहव्यवस्थापक योगिता चोगले, कार्यक्रमाचे आयोजक ‘मंदार काणे एंटरटेनमेंट’चे मंदार प्रमोद काणे, कोरिओग्राफर शुभांगी खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री कोमल शेटे यांना शाल, नारळ आणि विशेष गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

फॅशन शोच्या परीक्षक म्हणून स्वाती सोनावणे व कोरिओग्राफर शुभांगी खैरे यांनी कार्यभार सांभाळला. त्यांनाही ट्रॉफी आणि गिफ्ट देऊन गौरवण्यात आले. विशेष अतिथी म्हणून इंस्टाग्राम क्रिएटर्स प्रणया साळवी, सौरभ भोईर तसेच लागू बंधू २०२५ ची विजेती अक्षता शिर्के उपस्थित होती. यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले.

स्पर्धेत मिसेस २०२५ विजेती सौ. प्रज्ञा इंगळे व मिस २०२५ विजेती कुमारी मयुरी हुडेर ठरल्या. त्यांना आकर्षक क्राउन, साश, ट्रॉफी आणि गिफ्ट देण्यात आले. मिसेस गटात पहिला क्रमांक क्रांती पटेल यांनी तर द्वितीय क्रमांक श्रुती सावंत यांनी मिळवला. मिस गटात वैष्णवी दलाल पहिल्या तर साक्षी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. सर्व विजेत्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सहभागी सर्व मॉडेल्सना ट्रॉफी देण्यात आली. सूत्रसंचालन कोमल डांगे यांनी केले. मेकअप आर्टिस्ट अक्षता लांगोटे व चारू सर्पे तसेच उद्योजिका साक्षी खेडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्व मॉडेल्सना ड्रेस डिझायनर प्रतिभा सिंग यांनी पुरवले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी चंदू काका सराफ परिवाराचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande