सपकाळांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पालकमंत्र्यांद्वारे तीव्र निषेध
परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तीव्
मुख्यमंत्र्यांविरुध्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पालकमंत्र्यांद्वारे तीव्र निषेध


परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तर सेलूतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पाथरी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करतेवेळी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप पालकमंत्री सौ. बोर्डीकर यांनी केला. काँग्रेसजणांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत पराभव दिसतो आहे. त्यातूनच तोल ढासळतो आहे. त्याचे प्रत्यंतर हे पाथरीतील सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आक्षेपार्ह विधान होय, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, सेलू येथील भारतीय जनता पार्टीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने केली. सपकाळ यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande