जिंतूर : रांगोळीद्वारे मतदान जनजागृती
परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। जिंतूर नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान जनजागृती अभियान अंतर्गत निवडणूक कार्यासाठी नेमलेल्या कर्मचारी मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला कौसडी या ठिकाणी कार्यरत असणार्‍या कला शिक्षक
जिंतूरात भव्य व आकर्षक रांगोळीद्वारे मतदान जनजागृती


परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

जिंतूर नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान जनजागृती अभियान अंतर्गत निवडणूक कार्यासाठी नेमलेल्या कर्मचारी मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला कौसडी या ठिकाणी कार्यरत असणार्‍या कला शिक्षक ज्ञानेश्‍वर बर्वे यांनी भव्य व आकर्षक रांगोळी काढली. या रांगोळीच्या माध्यमातून उपस्थित असणार्‍या सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीच्या या कार्याबद्दल ज्ञानेश्‍वर बर्वे यांचा सेलू येथील उपविभागीय अधिकारी तथा जिंतूर नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, उपमुख्याधिकारी अनिल समिंद्रे, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंढे, मिडिया पथक प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत राखे, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती पथक प्रमुख त्र्यंबक पोले यांनी गुणगौरव व विशेष सन्मान केला. त्यांच्याकडे असलेल्या कला कौशल्याचे विशेष कौतुक केले. या कार्यासाठी राजेंद्र ढाकणे, मयूर जोशी कपिलदेव घुगे, प्रवीण घुले, दिनकर घुगे, मारोती घुगे यांनी इतर सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande