अहमदपूर नगरपरिषद निवडणूक : ७ उमेदवारांची माघार
लातूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। अहमदपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात गेल्या दोन दिवसांत एकूण ७ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्या
अहमदपूर


लातूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। अहमदपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात गेल्या दोन दिवसांत एकूण ७ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात १७६ उमेदवार उरले आहेत.

​१८३ पैकी ७ जणांची माघार

निवडणुकीसाठी एकूण १८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एकूण सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे: या प्रक्रियेत खालील उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले आहेत:

​तांबोळी जावेद अजिमोद्दीन

​कांबळे अरुणा बाबासाहेब

​सय्यद तब्बुसुम सरवर

​पाटील अर्चना अरुण

​कुरेशी शाहीन जहुर

​कुरेशी अनिस अब्दुल (प्रभाग ९ अ)

​कुरेशी अनिस अब्दुल (प्रभाग १० अ)

​विशेष म्हणजे, 'कुरेशी अनिस अब्दुल' या नावाच्या उमेदवारांनी प्रभाग ९ अ आणि १० अ अशा दोन ठिकाणांवरून अर्ज दाखल केले होते, हे दोन्ही अर्ज मागे घेण्यात आले आहेत.

सध्या १७६ उमेदवार रिंगणात असले तरी, अंतिम दिवशी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवार कायम राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीची अंतिम लढत कोणामध्ये होणार आणि निवडणुकीचे चित्र कसे असेल पूर्णपणे स्पष्ट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande