अकोला शहरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर
न्यू तापडिया नगरात बिबट्या तर शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ.. अकोला, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसले. अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात आज सकाळीच बिबट्याचे दर्शन झाल्याने
P


न्यू तापडिया नगरात बिबट्या तर शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ..

अकोला, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसले. अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात आज सकाळीच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या काही तासांनंतर शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.

सायाळ अचानक विद्यालया परिसरात घुसल्याने विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांना मोठी धडकी भरली. तत्काळ परिसर रिकामा करण्यात आला. दरम्यान, सायाळला पकडण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होते. अखेर वनमित्र बाळ काळणे यांनी शर्तीचे प्रयत्न करीत सायाळला सुरक्षितपणे जाळ्यात पकडण्यात यश मिळवले,यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पकडलेल्या सायाळला वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडून देण्यात आले.

न्यू तापडिया नगरात बिबट्याचा धुमाकूळ!

अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात आज सकाळी अचानक बिबट्याच्या उपस्थितीमुळे एकच खळबळ उडाली. सकाळी सुमारे नऊच्या सुमारास पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरात बिबट्याने काच फोडून उडी मारल्याचा प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, बंकावार यांच्या सासू घरातील पायरीवरून वर जात असताना त्यांना पायरीमध्येच बिबट झोपलेला दिसला. महिलेची चाहूल लागताच बिबट्याने थेट काच फोडत बाहेर पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.दरम्यान, रहिवाशांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालून बिबट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande