अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी तर्फे रॅलीचे आयोजन
प्रत्येक मतदारांशी भेट
अंबाजोगाई


बीड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोरजी मुंदडा तसेच प्रभाग क्रमांक ७ चे उमेदवार देशमुख गणेश उत्तमराव आणि धायगुडे सोनल श्रीकांत यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीदरम्यान प्रभागातील प्रत्येक मतदारांशी भेट घेऊन सविस्तर संवाद साधला.

अंबाजोगाई शहरातील प्रत्येक प्रभागात विकासाचा वेग वाढवणे, पारदर्शक प्रशासन प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची प्रभावी पूर्तता करणे या मुख्य उद्दिष्टांसाठी आघाडीचे सर्व उमेदवार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे मतदारांना विश्वासपूर्वक सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande