आंबेगाव तालुक्यातील (पुणे) आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष कें
आंबेगाव तालुक्यातील (पुणे) आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार


पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याकरिता नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या कराराचा मुख्य उद्देश आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरीता बायोफोर्टिफाइड झिंक-समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीचे धान्य त्यांच्या नियमित आहारात समाविष्ट करुन त्यांचे आरोग्य व पोषण समृध्द करणे हा आहे.

कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला ९ हजार विद्यार्थ्याकरिता बायोफोटिफाइड धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार दररोज ३० ग्रॅम धान्य, सुरुवातीला दोन महिन्यांसाठी आठवड्यातून दोनदा दिले जाईल, त्यानंतर ते नियमितपणे आहारात समाविष्ट केले जाईल. १ हजार विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा बायोफोर्टिफाइड-झिंक गहू आणि लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले लाडू आणि कुकीज असे तयार चविष्ठ पदार्थ पुरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये पोषणयुक्त आहाराचे महत्त्वाबाबत जागरूकता कार्यक्रम, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि.चा भागीदार, अॅग्रोझी ऑर्गेनिक्स (उरुळी कांचन, पुणे येथील) या उपक्रमांना सहकार्य केले जाणार आहे. हा करार आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य पोषण मिळावे आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande