अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीतपणे सुरु; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत-जास्त मराठा उद्योजक उभे करण्याचे काम महामंडळामार्फत केले जात आहे. अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युव
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीतपणे सुरु; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत-जास्त मराठा उद्योजक उभे करण्याचे काम महामंडळामार्फत केले जात आहे. अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरविल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे संपर्क साधावा. असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक उमेश कोल्हे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande