
जालना, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे दि. 25 नोव्हेंबर रोजी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमीटेड कंपनी पुणे यांचे कॅम्पस इंटरव्हयू बाबत. आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना द्वारा मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र कार्यालय, जालना या ठिकाणी दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड कंपनी पुणे यांच्या वतीने येथे विविध व्यवसायात भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशीन मेकॅनिक टूल मेंटेनन्स, मशीनिस्ट, मशीनिस्ट, (ग्राइंडर), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेकॅनिक ट्रॅक्टर, पेंटर (जनरल), प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, टूल अँड डाय मेकर (प्रेस टूल्स, जिग्स अँड फिक्स्चर), टर्नर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), वायरमन आदि व्यवसायातील उमेदवार यात सहभागी होवू शकतील. आयटीआय उत्तीर्ण असणा-या प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. सोबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक राहिल. या भरती मेळाव्यात आय.टी.आय. उत्तीर्ण असणारे असणा-या उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, बी.टी. आर. आय., जालना यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis