नांदेड : तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न
नांदेड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।जगभरात तृतीयपंथीय व्यक्तीवरील हिंसाचाराविरुध्द जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रम आयोजीत करण्या
अ


नांदेड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।जगभरात तृतीयपंथीय व्यक्तीवरील हिंसाचाराविरुध्द जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला . तीयपंथीयांवरील होणाऱ्या अन्याय, हिंसा व भेदभावाविरुध्द समाजात संवेदनशीलता निर्माण करण्यात येत आहे. त्यानुसार समाजा कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींकरीता मेणबत्ती लावुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर दोन मिनिट मौन बाळगुन त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करण्यात आली. नंतर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी तृतीयपंथीयांना समाजामध्ये काम करत असताना हिंसामुक्त समाजासाठी जनजागृती, लिंग संवेदनशीलता, तृतीयपंथीय अधिकार या विषयांवर व शासनाच्या विविध योजनाद्वारे मदत व संरक्षणाबाबत मर्गदर्शन केले.

या कार्यक्रमास संतोष चव्हाण, सहाय्यक लेखा अधिकारी श्रीमती माधवी राठोड, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एस.एम.कदम, सर्व कर्मचारी तथा तृतीयपंथी यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था कमल फाउंडेशन नांदेड व सीवायडीए पुणे यांचा सहभाग होता. तसेच तृतीयपंथीयांचे गुरुमाय फरीदा, नरसी नायगांव तसेच अर्चना नांदेड व अमरदिप बोधने, शुभांगी, लक्ष्मी, राणी देवकर, शहानुर बकस इत्यादी उपस्थिेत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande