पुण्यात राष्ट्रवादी‌ला 40 जागा देण्यास भाजपचा नकार
पुणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत महायुती होणार की नाही, याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्
पुण्यात राष्ट्रवादी‌ला 40 जागा देण्यास भाजपचा नकार


पुणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत महायुती होणार की नाही, याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची शक्यता आहे. जागावाटपासंदर्भात झालेल्या प्राथमिक चर्चेत 11 प्रभागांत 40 जागा अजित पवार गटाने मागितल्याची माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली असून, ही मागणी भाजपने फेटाळल्याने राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात फूट पडली. यातील अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा गट महायुतीत सहभागी होऊन राज्याच्या विकासाचा दाखला देत सत्तेत सहभागी झाला, तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा गट हा विरोधी गटात गेला आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे सुरू आहे. नगरपरिषदा, नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. थोड्याच दिवसांत जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकादेखील होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande