बालरंगभूमी परिषदेतर्फे शनिवारी परभणीत ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव
परभणी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। बालरंगभूमी परिषदेच्या परभणी शाखेतर्फे शनिवार 22 नोव्हेंबर रोजी कारेगांव रस्त्यावरील कौस्तुभ मंगल कार्यालयात ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत व
बालरंगभूमी परिषदेतर्फे शनिवारी परभणीत ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव


परभणी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। बालरंगभूमी परिषदेच्या परभणी शाखेतर्फे शनिवार 22 नोव्हेंबर रोजी कारेगांव रस्त्यावरील कौस्तुभ मंगल कार्यालयात ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत व कवी इंद्रजित भालेराव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृती आणि परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी अशा उद्देशाने राज्यातील बाल कलावंतांच्या सर्वागिण कलात्मक विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या बालरंगभूमी परिषदेतर्फे महाराष्ट्राची कला व परंपरा जपतांना बालमनावर संस्कार करण्याच्या अनुषंगाने ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लोककलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरूप न राहता या कलांची महती बालकांपर्यंत पोहचून गायन, वादन, नृत्य क्षेत्रात त्यांनी कौशल्य प्राप्त करावे, हा महोत्सवाचा उद्देश आहे.

जल्लोष लोककलेचा महोत्सवात समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनासोबतच एकल लोकनृत्य, लोकगीत गायन व लोकवाद्य वादनाचे स्पर्धात्मक आयोजन केले आहे. महोत्सवात सहभागी होणार्‍या सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनासाठी सर्वोत्कृष्ठ तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ठ तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर एक हजार रुपये न प्रमाणपत्र, एकल लोकगीत गायन, लोकवाद्य वादन व लोकनृत्य याकरिता सर्वोत्कृष्ठ दोन हजार रूपये, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, उत्कृष्ट 1 हजार 500 रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम 1 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 500 रुपये व प्रमाणपत्र असे प्रशंसनीय पारितोषिके देण्यात देणार आहेत.

दरम्यान, या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन बालरंगभूमी परिषद शाखा परभणीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande