राजकीय पक्षांच्या आधी पक्षी मैदानात! अमरावतीत सहा पंखधारी उमेदवारांची निवडणूक
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागलेले असताना महापालिकेच्याच पुढाकारातून त्याआधी अनोखी निवडणूक होत आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिका आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी (डब्ल्यूईसी
राजकीय पक्षांच्या आधी पक्षी मैदानात! अमरावतीत सहा पंखधारी उमेदवारांची निवडणूक


अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागलेले असताना महापालिकेच्याच पुढाकारातून त्याआधी अनोखी निवडणूक होत आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिका आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी (डब्ल्यूईसीएस) यांच्या संयुक्त सहकार्यातून अमरावती ‘शहराचा पक्षी’ (सिटी बर्ड) निवडला जाणार आहे. त्यासाठी अमरावतीकरांना मत नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. अमरावती ‘शहराचा पक्षी’ निवडण्याची प्रक्रिया मंगळवारी १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अमरावतीकरांना ऑनलाइन मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या पक्ष्याची निवड करण्याचे आवाहन आयक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.अमरावती शहराच्या ओळखीशी सुसंगत आणि येथील पर्यावरणात सहज आढळणाऱ्या सहा पक्ष्यांची नावे उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आली आहे. हे पक्षी अमरावती शहराच्या जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतात, हे विशेष.

हे पक्षी आहेत उमेदवार

भारतीय राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल)

तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट)

भारतीय हूदहूद (इंडियन हुपो)

पिंगळा (इंडियन आऊलेट)

शिक्रा

भारद्वाज (ग्रेटर कूकल)

मतदान वेळापत्रक, आवाहन

मतदान कालावधी : १८ ते २८ नोव्हेंबर

निकाल घोषणा : ३० नोव्हेंबर २०२५

मतदानासाठी ऑनलाइन पोर्टलची लिंक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande