बांधकाम कामगार नोंदणी नि:शुल्क : मध्यस्थींना पैसे न देण्याचे आवाहन
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम निरंतर सुरू आहे. कामगार उ
बांधकाम कामगार नोंदणी नि:शुल्क : मध्यस्थींना पैसे न देण्याचे आवाहन


अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम निरंतर सुरू आहे. कामगार उप आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, ही संपूर्ण प्रक्रियाmahabocw.inया संकेतस्थळाद्वारे नि:शुल्क ऑनलाईन पद्धतीने केली जाते.

मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहेत. अस्थायी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांसाठी ग्रामसेवक किंवा महानगरपालिका, नगरपरिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून 10 दिवसांचे प्रमाणपत्र मिळू शकते. नोंदणी व लाभासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांकडून मध्यस्थीमार्फत पैशांची मागणी केली जात आहे. यावर विभागाने स्पष्ट केले आहे की, कार्यालयाचा कुठल्याही बाहेरील दलालांशी संबंध नाही आणि कुठलेही अतिरिक्त रक्कम आकारली जात नाही.

जिल्ह्यातील कुठल्याही व्यक्तीने किंवा अधिकारी, कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्यास, कामगारांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभागास रितसर तक्रार नोंदवावी. यामुळे कामगारांची फसवणूक होणार नाही. सर्व कामगारांनी www.mahabocw.in वर नोंदणी, नूतनीकरण करावे आणि मालक, ठेकेदारांनी देखील 'आपले सरकार' पोर्टलवर नोंदणी करून कामगारांना नियोक्ता प्रमाणपत्र द्यावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त, अमरावती यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande