धारूर स्मार्ट शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध - आ. सोळंके
बीड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने धारूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला. ऐतिहासिक वैभव लाभलेले धारूर हे शहर आधुनिक सुविधांनी समृद्ध, सुबक आणि स्मार्ट सिटी म्हणून विकसित व्हावे, हा आमचा प्रमुख अजेंडा असून
कॉर्नर बैठका उत्स्फूर्त प्रतिसादात


बीड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने धारूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला. ऐतिहासिक वैभव लाभलेले धारूर हे शहर आधुनिक सुविधांनी समृद्ध, सुबक आणि स्मार्ट सिटी म्हणून विकसित व्हावे, हा आमचा प्रमुख अजेंडा असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, शहरातील मायबाप जनतेचा विश्वास, प्रेम आणि सहकार्य यांच्यावर पुढील वाटचाल अधिक बळकट होईल.

प्रभाग क्र. १, २ आणि ३ मधील कॉर्नर बैठका उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande