
* प्रत्येक महिन्याला सादर करावा लागणार अहवाल
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)
मुद्रांक शुल्कातील माफी किंवा सवलतीचा गैरवापर रोखण्यासाठी नोंद व मुद्रांक विभागाने कडक उचलली आहेत. महसुलाची होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी माफी मिळालेल्या प्रत्येक दस्ताची दरमहा अनिवार्य तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व दुय्यम निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शुल्क माफीच्या प्रकरणात काही ठिकाणी अनियमितता दिसून येत असल्याच्या तक्रारीनंतर विभागाने यंत्रणा अधिक कडक केली आहे. प्रत्येक कार्यालयाने आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व माफी दस्तांचे बारकाईने परीक्षण करणे आवश्यक झाले आहे. यापुढे शुल्कमाफी मिळालेल्या कोणत्याही दस्तास 'स्किप' करता येणार नाही. दस्ताच्या पात्रतेपासून ते प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करावा लागणार आहे.अहवाल सादर न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.समाजोपयोगी उपक्रमांसाठी जमिनीची खरेदी होत असेल तर, अशा प्रकरणांत मुद्रांक माफी केली जाते. मात्र, याचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे माफी किंवा सूट प्रकरणाची तपासणी मुद्रांक विभागामार्फत होणार आहे.तपासणीदरम्यान पात्र नसलेल्या व्यक्तींना माफी देणे, चुकीचे मूल्यांकन, नियमांतील तफावत आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थीवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.यूजीसीच्या आदेशाचे पालन करणार नसतील तर संबंधित महाविद्यालयांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई होऊ शकते. संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई देखील गंभीर प्रकरणात होऊ शकते. त्यामुळे संस्थांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये.
कार्यालयाला ५ तारखेपर्यंत दस्त पाठवणे अनिवार्य
प्रत्येक कार्यालयाने मागील महिन्यात दिलेल्या माफी दस्तांची यादी दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे पाठवावी लागणार आहे.यापुढे विलंब केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.
दर महिन्याला तपासणी करावी लागणार
दस्तांची तपासणी वर्षातून एक-दोनदा न होता दर महिन्याच्या आधारावर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनियमितता किंवा चुकीचे दस्त तत्काळ लक्षात येतील, असा विभागाचा विश्वास आहे. त्यासाठीच प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करणे आवश्यक केले आहे. जिल्हास्तरावर अंतिम तपासणीची जबाबदारी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी