
अमरावती, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। अमरावती महानगर पालिकेतील अग्निशमन विभागाच्या बडनेरा झोनमध्ये कार्यरत राजेश वासुदेव मोहन (वय ५५) यांनी वरिष्ठांच्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून गुरुवारी विष घेऊन आत्महत्या केली.
फायरमन राजेश वासुदेव मोहन यांना दलातील अधीक्षक संतोष केंद्रे व लक्ष्मण पावडे गत तीन ते चार वर्षापासून सातत्याने त्रास देत होते, असा राजेश मोहन यांचा आरोप आहे. ते एमआयडीसी येथील फायर ब्रिगेडच्या कॉर्टरमध्ये राहत होते. ते कॉर्टर खाली करून देण्याचा तगादा त्यांनी होता. तसेच ते कामावर असतानाही त्यांची गैरहजेरी लावणे, वरिष्ठांकडे तक्रारी हा अशा प्रकारे मानसिक छळ करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या परिवारास सांगितले होते.आज दुपारच्या सुमारास राजेश च्या परिवारातील नातेवाईक,व परिसरातील नागरिकांनी इर्विन चौकात जोरदार चक्का जाम करत केंद्रे,पावडे,व सावकार यांच्यावर तात्काळ ओट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रस्त्यावर वाहतूक जाम झाल्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी राजेश मोहन यांच्या परिवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र राजेश मोहन चा परिवार काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी केंद्रे,पावडे,व खाजगी सावकार याच्या विरुध्द आक्रसिटी चा गुन्हा व निलंबनाचे पत्र महानगर पालिकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी