
नाशिक, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। गंजमाळ येथील श्रमिक नगर झोपडपट्टीत आज सकाळी शॉप सर्किटमुळे अचानक आग लागल्याने लोकांची धावपळ झाली. प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही, आग आटोक्यात आणली.
श्रमिक नगर गंजमाळ सय्यद पीर बाबा चौक साठ फुटीरोड आज सकाळी सात वाजेच्या सुमारास्वार शॉर्ट सर्किट होऊन तेथील झोपडपट्टीतील घरांना आग लागली. या ठिकाणी श्रमजीवी नागरिक राहत असल्यामुळे सकाळच्या कामाला जाण्याच्या धावपळीत एका घरातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच आरडा ओरड करण्यात आली. लोकांनी धावत प्रसंगावर राखत घरातील सिलेंडर घेऊन बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. जास्त मज्जाव करायला संधी मिळाली नाही.
कामगार वर्ग सकाळी आवरण्याच्या गडबडीत असतानाच ही आग लागल्याने प्रत्येक घरात फारसे कोणी नव्हते मात्र आग भडकू नये या हे लक्षात येताच आठ दहा घरातील नागरिकांनी सिलेंडर सह घराबाहेर पडणे पसंत केले व अग्निशामक दलाला फोन करून पाचारण केले. शिंगाडा तलाव येथून झोपडपट्टी जवळच असल्याने काही मिनिटातच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. लोकांना दूर सारत ही आग आटोक्यात आणली.
या आगीमध्ये सुमारे आठ ते दहा हजारांचे नुकसान झाले असून जीवित हानी कोणतीही झालेली नाही. अधिक चौकशी केली जात आहे. अचानक लागलेल्या या आगीत रुक्मिणीबाई हिरामण गहिरे, नंदाबाई रूपंचांद सुट्टे, जमुनाबाई प्रभाकर भगूरे, अफजलखान समशेर खान, सलीम युसूफ शेख, नफिसा अल्ताफ शेख, अक्रम बाबर खान, भाडेकरी सबा शरीब शेख, मंदाबाई अंकुश शिंदे, नितीन अंकुश शिंदे, मनकर्णाबाई सदावर्ते, राधाबाई बाजीराव घोडे आदींच्या घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV