गंगापूर नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार- आ. सतीश चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। गंगापूर नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री.संजय विठ्ठलराव जाधव तसेच राष्ट्रव
आ


छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। गंगापूर नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री.संजय विठ्ठलराव जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत नगरसेवकांच्या प्रचारार्थ गंगापूर शहरात प्रभाग क्र.1, प्रभाग क्र.4, प्रभाग क्र.8, प्रभाग क्र.10 मधील नागरिकांशी आमदार सतीश चव्हाण यांनी संवाद साधला. आमदार चव्हाण म्हणाले कीगंगापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भरीव असा निधी मंजूर करून आणला. या माध्यमातून मराठा भवन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक, लुम्बिनी बुद्ध विहारचा विस्तार व विकास तसेच शहरातील विविध रस्त्यांची कामे करता आली. शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा तसे इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय होतील असा दावा आमदार चव्हाण यांनी केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप बनकर, प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ.शितल विशाल दारुंटे, श्री.तुकाराम बारीकराव सटाले, प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री.नवनाथ विठ्ठलराव कानडे, सौ.द्वारकाबाई दत्तू वाघमारे, प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार .सुमनबाई अशोक गायकवाड, श्री.सोपान गहीनाथ देशमुख, प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री.संतोष गोविंदराव अंबिलवादे, .सोनाली योगेश पाटील आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande