उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – डॉ. प्रवीण गेडाम
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पूर यामुळे 1 जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत प्रति हे
उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – डॉ.  गेडाम     ॲग्री स्टॅक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला


उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – डॉ.  गेडाम     ॲग्री स्टॅक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला


नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

अतिवृष्टी आणि पूर यामुळे 1 जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत प्रति हेक्टरी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. हे अनुदान विभागातील पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले असून आतापर्यंत विभागातील 16 लाख 59 हजार 519 शेतकऱ्यांच्या खात्यात 90360.79 लाख रुपये एवढे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक आयडी तयार करण्यात आलेला नाही, अशा शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक आयडी तयार करण्याबाबत विशेष मोहिम स्वरुपात कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. यासंदर्भात येत्या सात दिवसात गावनिहाय ॲग्री स्टॅक मध्ये नोंदणी करावयाच्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करुन त्यांची तात्काळ नोंदणी करण्याबाबतचे निर्देश विभागातील जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागास देण्यात आले आहेत.

नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात माहे 1 जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शासनाने कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी रुपये 8500, बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी रु. 17000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी रुपये 22500 याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार विभागातील पाचही जिल्ह्यांना खालीलप्रमाणे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

क्र

जिल्हा

नैसर्गिक आपत्तीचा कालावधी

बाधित शेतकरी संख्या

बाधीत क्षेत्र

मंजूर अनुदान रक्कम (लक्ष)

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम (लक्ष)

1

नाशिक

जून ते सप्टेंबर, 2025

434726

303821

33248.91

20189.77

2

धुळे

16429

11618

1025.01

516.61

3

नंदुरबार

956

457

55.00

37.32

4

जळगाव

357692

271736

32822

16817.09

5

अहिल्यानगर

849716

626266

88023.66

52800

एकूण

1659519

1213898

155174.58

90360.79

याशिवाय, खरीप 2025 या कालावधीत अतिवृषटी आणि पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता हेक्टरी रक्कम रुपये 10 हजार ही विशेष मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हानिहाय प्राप्त अनुदान आणि त्याच्या वितरणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

क्र

जिल्हा

नैसर्गिक आपत्तीचा कालावधी

बाधित शेतकरी संख्या

बाधीत क्षेत्र

मंजुर अनुदान रक्कम (लक्ष)

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम (लक्ष)

1

नाशिक

जून ते सप्टेंबर, 2025

432695

302281

30228.93

18019.54

2

धुळे

16429

11618

1161.82

574.32

3

नंदुरबार

956

457

45.70

29.19

4

जळगाव

355978

270926

27092.65

13324.18

5

अहिल्यानगर

853235

626266

62626.6

36440.85

एकूण

1659293

1211548

121154.9

68388.08

प्रलंबित रक्कम ही ई-केवायसी करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान मदतीचे वाटप तात्काळ जमा होण्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे ॲग्री स्टॅक आयडी तयार झालेले आहे, त्यामधील पडताळणी करुन अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याची कार्यवाही कऱण्यात येत आहे. ॲग्री स्टेंक आयडी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक् डॉ. गेडाम यांनी दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची ॲग्री स्टॅक मध्ये नोंदणी झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना भविष्यात मदतीचे वाटप करतांना त्यांना ई- केवायसी करण्याची गरज भासणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक मध्ये आपली नोंदणी करण्याबाबतचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ज्या शेतकऱ्यांना आज रोजी अॅग्री स्टॅक आयडी उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांनी ई - केवायसी केल्यास त्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम तात्काळ जमा होऊ शकते. या अनुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुदान वाटप प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी गावनिहाय तलाठी यांच्यामार्फत चावडीवर चिकटवून मदतीस प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचे ई- केवायसी पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. या निर्देशानुसार पुढील एक आठवड्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

याशिवाय ज्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे नाव, त्यांचा गट क्रमांक, व त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली रक्कम याची गाव निहाय यादी तयार करुन अशी यादी प्रत्येक गावात प्रसिध्द करण्याबाबत व ही यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यास किती मदत अनुज्ञेय होती व किती रक्कम प्राप्त झाली याची पडताळणी करणे शक्य होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande