
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती व सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमापूर्वी ‘क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा केली असून, या उपक्रमासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)चे अधिकृत पार्टनर म्हणून स्वागत केले आहे.
भारत आणि ग्लोबल साउथमध्ये मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील अशा अत्याधुनिक हवामान उपायांना ओळख, चाचणी आणि व्यापक प्रसार देण्याच्या उद्देशाने हा अभिनव आणि बहुपदरी उपक्रम राबवला जाणार आहे. प्रोजेक्ट मुंबई, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम 17 ते 19 फेब्रुवारी 2026 रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार असून, याच्या उद्घाटनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
एनएसई हा या उपक्रमात इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर म्हणून नेतृत्व करणार असून हवामान बदल शमन, अनुकूलन व रेसिलियन्ससाठी आवश्यक तंत्रज्ञान व नवकल्पनांना प्रकाशझोत मिळणार आहे. स्टार्टअप्स, संशोधक, विद्यार्थी, एनजीओ, सीएसओ आणि क्लायमेट उद्योजक यांच्यासाठी खुले असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सादरीकरण एमसीडब्ल्यू 2026 मंचावर केले जाईल. ग्लोबल साउथमधील अनेक देशांना आमंत्रण दिले गेले असून, भारतातील नवकल्पनांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे हे व्यासपीठ ठरणार आहे.
महाराष्ट्र शासन, माझी वसुंधरा,बीएमसी, मॉनिटर डेलॉइट, एचटी पारेख फाउंडेशन, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह (आयसीसी), शक्ती फाउंडेशन, डब्ल्यूआरआय इंडिया, युनिसेफ, रेनमॅटर फाउंडेशन, महिंद्रा ग्रुप, क्लायमेट ग्रुप, एनजीएमए यांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था या उपक्रमाच्या साथीसाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे जागतिक व स्थानिक नेतृत्वाचा अद्वितीय संगम साधला जात आहे.एमसीडब्ल्यू हे नागरिक-केंद्रित उपक्रम म्हणून रचले गेले असून हवामान कृती, संवाद आणि चित्रपट, पाककला, कला, क्रीडा, आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांमधील हवामानविषयक उपक्रमांना चालना देणार आहे. NSS स्वयंसेवकांच्या माध्यमातून महाविद्यालयांची मोठ्या प्रमाणावर भागीदारी सुनिश्चित केली जाईल.
प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले की, मुंबई क्लायमेट वीक हे कल्पनांना प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्यासाठी सक्षम प्लॅटफॉर्म देण्यास वचनबद्ध आहे. एनएसएस सोबतची भागीदारी या प्रयत्नांना नवी दिशा व वेग देणारी ठरेल. स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, तज्ञ व धोरणकर्त्यांना एकाच मंचावर आणून हवामान कृतीसाठी नवे मार्ग खुले होत आहेत.
एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, फेब्रुवारी 2026 मध्ये होणारा मुंबई क्लायमेट वीक हा भारताच्या नेट झिरो 2070 ध्येयासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. 2070 पर्यंत 10 ट्रिलियन USD पेक्षा अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असून स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक व सक्षम पायाभूत सुविधांसाठी भांडवली बाजारात विविध प्रकारची आर्थिक साधने उपलब्ध आहेत. Monthly Electricity Futures, GSS+ आणि Transition Bonds, Green Equity Pathway, CFD आणि आगामी कार्बन मार्केट उत्पादने ही त्याची उदाहरणे आहेत. हरित नवोन्मेष आणि शाश्वत विकासाच्या जागतिक नेतृत्वाकडे भारताला नेण्याचा आमचा संकल्प दृढ राहील.
इनोव्हेशन चॅलेंजद्वारे सहभागी स्टार्टअपना मास्टरक्लास, क्षमता-विकास सत्रे, तांत्रिक मार्गदर्शन, ज्यूरी मूल्यांकन तसेच “Investor Speed-Seeding Forum” मधून थेट गुंतवणूकदारांशी संवादाची संधी मिळेल. अंतिम स्पर्धकांना MCW Solutions Exhibition Arena मध्ये सादरीकरणाची संधी मिळणार असून पायलट्स, भागीदाऱ्या आणि MoUs साठी व्यासपीठ खुलं होईल. या प्रक्रियेतून अनेक स्टार्टअप्स प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule