सनी फुलमाळीचा आ. धस यांनी केला सत्कार
बीड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघातील पाटसरा येथील कुस्तीपटू सनी फुलमाळी याचा भाजप आमदार सुरेश धस यांनी सत्कार केला. बहरीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युथ बीच कुस्ती (Beach Wrestling) स्पर्धेत त्याने मिळवलेल्य
अ


बीड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघातील पाटसरा येथील कुस्तीपटू सनी फुलमाळी याचा भाजप आमदार सुरेश धस यांनी सत्कार केला.

बहरीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युथ बीच कुस्ती (Beach Wrestling) स्पर्धेत त्याने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल त्याचा अभिमानाने गौरव केला.

सनीच्या खेळ प्रवासात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, या उद्देशाने उद्योजक संदीप गर्जे आणि संदीप वांढेकर यांच्या साईदीप इंडस्ट्रीज तर्फे रु. १,००,०००/- ची रक्कम DD द्वारे त्याच्या खात्यात जमा करण्यात आली. तसेच पुढील काळातही गरजेनुसार आवश्यक आर्थिक मदत सातत्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रीय पातळीवर गावाचे, तालुक्याचे आणि मतदारसंघाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सनीला आमदार धस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande