
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
साधुग्राम येथील सुमारे १८०० झाडे तोडण्यास पर्यावरण प्रेमींबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला असून त्यास तातडीने स्थगिती देण्याच्या मागणीसाठी साधुग्राम येथेच निदर्शने करण्यात आली.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून नाशिक महानगरपालिकेत आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले. दिनकर पाटील, सलीम शेख, सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना वृक्षतोडीस विरोध करण्यात आला.
एकीकडे हरित कुंभ अशी घोषणा करण्यात आली आणि दुसरीकडे अत्यंत डेरेदार, जुनी झाडे तोडण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. महापालिका केवळ सर्वेक्षणासाठी झाडांवर फुल्या मारत असल्याने ही सर्वच झाडे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे हरित कुंभाऐवजी उजाड कुंभ असा संदेश जाईल, असेही यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सुजाता डेरे, मनोज घोडके, संतोष पिल्ले, निलेश शहाणे, योगेश दाभाडे, सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, धीरज भोसले, नितीन माळी, विधानसभा निरीक्षक राकेश परदेशी, संदीप दोंदे, प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप, सचिन रोजेकर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक पर्यावरण प्रेमी मोठे संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV