
- जमिन संपादनासाठीच्या सुनावणीला सुरुवात
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
: सिंहस्थ कुंभमेळयासाठी साधुग्राममधील 283 एकर जमिनीच्या संपादनासाठी मनपाने हालचाली सुरु झाल्या आहे. यासंदर्भात गुरुवारी प्रशासनाने तेरा सामाजिक संस्थांची सुनावणी घेत त्यांच्याशी वाटाघाटीबाबत चर्चा केली. तर पुढच्या आठवडयात शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलवले जाणार आहे. दरम्यान साधुग्राममधील एकुण 377 एकरपैकी मनपानेे 94 एकर जागेचे संपादन केले असून उर्वरीत 283 एकरवर घोडे अडले आहे. या जागेचाच तीढा सोडवण्यासाठी 2100 कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव मनपाने शासनाला सादर केल्याचे मनपातील सूत्रांनी म्हटले आहे.
महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात साधुग्रामबाधितांची सुनावणी वाटाघाटी समितीकडून घेण्यात आली. दोन वर्षानी शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा बाराशे एकरवर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूव जाहीर सभेतून सांगितले होते. परंतु महापालिका प्रशासनाला अद्याप साधुग्राममधील जागेचेच संपादन करता आलेले नाही. उर्वरीत जागेचा तीढा कसा सोडवला जाणार असा सवाल केला जातो आहे. मात्र आता पालिकेने साधुग्रामचा विषय सोडवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. 283 एकर ज्या व्यक्तीं, संस्थाच्या नावावर आहेत. त्यांची टप्याटप्याने सुनावणी घेतली जाणार आहे. यातील पहिल्या टप्यास गुरुवारपासून सुरवात झाली. एकुण तेरा सामाजिक संस्थांनी हजेरी लावली. असता त्यांच्याशी वाटाघाटी समितीच्या सदस्यांनी संवास साधत पालिका कुठपर्यत मोबदला देऊ शकते. याबाबतची कल्पना दिली.
वाटाघाटी समितीमधील सदस्य
अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली वाटाघाटी समितीची स्थापना केली असून विशेष म्हणजे या समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. सदर समितीत नगररचनेचे उपसंचालक, सहायक संचालक, मुख्य लेखा वित्त अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, विधी विभाग प्रमुख, शहर अभियंता, अधिक्षक अभियंता हे या समितीमधील सदस्य आहेत.
तेरा संस्थांकडे 60 एकर क्षेत्रसाधुग्रामधील 377 एकरपैकी 60 एकर क्षेत्र गुरुवारी बोलावलेल्या सामाजिक संस्थांकडे आहे. तर उर्वरीत 223 एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांची सुनावणी घेतली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV