पुण्यातील मुख्य पाच रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना सुरू
पुणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पुन्हा ‌‘पे अँड पार्क‌’ योजना सुरू केली आहे. सुरुवातीला प्रमुख पाच रस्त्यांवर ही योजना राबवली जाणार असून, याची निव
पुण्यातील मुख्य पाच रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना सुरू


पुणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पुन्हा ‌‘पे अँड पार्क‌’ योजना सुरू केली आहे. सुरुवातीला प्रमुख पाच रस्त्यांवर ही योजना राबवली जाणार असून, याची निविदा देखील काढण्यात आली आहे.

या रस्त्यांवर तब्बल 6,344 दुचाकी आणि 618 चारचाकी पार्किंगची सोय उपलब्ध होणार आहे, तर 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील वाढत्या वाहनसंख्येला शिस्त लावण्यासाठी सात वर्षांनी महापालिकेने ‌’पे अँड पार्क‌’ योजना पुन्हा सुरू केली आहे. सुरुवातीला जंगली महाराज रस्ता, एफ. सी. रोड, लक्ष्मी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट, विमाननगर रस्ता आणि बिबवेवाडीतील मुख्य रस्ते या पाच महत्त्वाच्या ठिकाणी पे अँड पार्क केले जाणार आहेत. यासाठी महापालिकेने निविदा जाहीर केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande